कोपरखैरणे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत पटकावले विजेतेपद


| उरण | वार्ताहर |

महानगरपालिका क्षेत्रात गेल्या अनेक वर्षे तायक्वांदो खेळात वर्चस्व गाजवणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 36, कोपरखैरणे गाव या शाळेतील मुला-मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून 11 सुवर्ण, 13 रौप्य व 16 कांस्य अशी एकूण 40 पदकांची कमाई करीत सलग दुसऱ्यांदा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. शाळेच्या या देदीप्यमान कामगिरीचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.
दि. 22 नोव्हेंबर रोजी वारकरी भजन, सेक्टर 3, राजीव गांधी मैदानाजवळ, सीबीडी, खालापूर येथे नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू : देवयानी हिरखे, श्रेया शेलार, शेजल कंक, आयुष लिघंटे, आर्यन दिंडे, रौप्यपदक : जानवी भारती, निकिता राठोड, काजल धाकर्गे, वैभव गुंजाळकर, अदिती संभाबळे, अरविंद, कांबळे, चव्हाण, आर्यन निकम, तनिषा अनिल, श्रावणी उबाळे, श्रद्धा खाटपे, दुर्शा अनिल, सीमा राठोड, श्रावणी शेलार, करिश्मा चव्हाण, खुशी विश्वकर्मा, जयश्री जाधव, दिलशान भालेराव. कांस्यपदक : चैत्रा इजेरी, ममता मोहिते, साक्षी राऊत, सारिका अंभोरे, सानिका हिरखे, मनिषा राऊत, समृध्दी पाटील, चैताली मांढरे, पूनम पवार, आकाश यमकर, अरविंद पत्तार, अक्षय ढवळे, अदित्य हिरवे, अधर्ष कांगणे, मानव मुलगे, बुध्दम सरवदे यांनी यश संपादन केले.

या सर्व खेळाडूंच्या व संघाच्या यशामध्ये सुभाष पाटील (तायक्वांदो मुख्य प्रशिक्षक, नवी मुंबई मनपा), दिनेश भोपी (तायक्वांदो प्रशिक्षक), सीमा भोपी (तायक्वांदो प्रशिक्षक), प्रशांत गाडेकर (संघ व्यवस्थापक), वर्षा शिंदे (संघ व्यवस्थापक), ज्ञानेश्वर घुगे, दत्तात्रय गागरे, नयना गटकळ, पंकज पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.या यशाबद्दल शाळेच्या खेळाडूंचे व सर्व मार्गदर्शक व सहकार्य करणाऱ्यांचे ललिता बाबर (उपायुक्त नवी मुंबई मनपा), अरुणा यादव (शिक्षणाधिकारी नवी मुंबई मनपा), रेवप्पा गुरव (जिल्हा कीडा अधिकारी नर्व मुंबई मनपा), सुलभा बारघरे (विस्तार अधिकारी नवी मुंबई मनपा), शिवराम पाटील (नगरसेवक नवी मुंबई मनपा), दिपाली संखे (मुख्याध्यापिका मनपा शाळा क.36) यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून व शाळेतील इतर कर्मचाऱ्यांकडून खेळाडूंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version