| रोहा | प्रतिनिधी |
पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुक कालावधीत निःपक्षपातीपणे काम करावे, अशा सूचना शेकाप नेते माजी आमदार पंडित पाटील यांनी अधिकारीवर्गाला दिल्या आहेत.
याबाबत पंडित पाटील यांनी रोहा प्रांत व तहसील कार्यालय येथे समक्ष भेट देऊन निवडणूक कालावधीत कोणावरही आपल्याकडून अन्याय होणार नाही याबाबत अधिकारीवर्गाला सूचना दिल्या. तर, उपस्थित अधिकारीवर्गाकडूनही निःपक्षपणे काम करून निवडणूक कालावधीत शंभर टक्के पारदर्शकता बाळगली, असे यावेळी स्पष्ट केले.
यावेळी शेकाप नेते नंदकुमार म्हात्रे, गणेश मढवी, गोपिनाथ गंभे, विकास तांडेल, अमोल शिंगरे आदी होते. पंडित पाटील यांनी आगामी निवडणुकीबाबत कंबर कसली असून, निवडणूक कालावधीत गाफील न राहता अधिक कटाक्षता बाळगून काम करण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.