अखंडीत वीज पुरवठ्यासाठी प्रकाश दुतांचे भर पावसात काम

| रायगड | प्रतिनिधी |

जिल्यातील डोंगर दऱ्यातून जाणाऱ्या रोहा भागात पावसाळ्याच्या दिवसात अखंडित वीजपुरवठा करणे हे खूप जिकरीचे काम आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी तांत्रिक बिघाड होत असतात. महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता भर पावसात डोंगर दऱ्यातून वीज वाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम करून ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केल्याबद्दल मुख्य अभियंता भांडूप परिमंडल सुनिल काकडे यांनी या प्रकाश दूतांचे कौतुक केले.

पावसाळा सुरु झाल्यानंतर तांत्रिक कारणाने विद्युत यंत्रणेत बिघाड होऊ शकतात. रोहा येथील ग्रामीण भागात सातत्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार आढळून आले. अधीक्षक अभियंता, पेण इब्राहीम मुलाणी यांच्या आदेशानुसार व कार्यकारी अभियंता, रोहा प्रदीप डाळू यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा येथील धटाव, मुरूड, वाली टॅप, हनुमान टेकडी तसेच मुनाचे टॅप या डोंगराल भागातील प्रत्येक खांबाचे निरीक्षण करण्यात आले. यामध्ये, उच्चदाब वाहिनीवरील तांत्रिक बिघाड किंवा खांबावर वाढलेल्या झाडाच्या फांद्या/वेली छाटने अशी अनेक कामे महावितरणच्या प्रकाश दूतांनी भर पावसात यशस्वीपणे पूर्ण केली. याठिकाणी दुरुस्तीच्या कामाला जाण्यासाठी अनेक अडथळे येत होते. तरीही या अवघड परिस्थितीत सुद्धा वीज वाहिनीवर काम करून ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणच्या रोहा विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांची कामगिरी कौतुकास्पद आहे.

Exit mobile version