सावळा-हेदवली रस्त्याचे काम अर्धवट

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामात अनियमितता
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील सावळा-हेदवली या गावांना जोडणारा रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने सततच्या मागणीनंतर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण करण्याचे काम मंजूर झाले होते. गेली वर्षभर या रस्त्याचे काम सुरु असून अजूनही रस्त्याचे काम अर्धवट असून स्थानिक ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, शासनाने या रस्त्याच्या एकमत अनियमितते बद्दल दक्षता समितीकडून चौकशी करण्याची मागणी हेदवली ग्रामस्थांनी केली आहे.

मुरबाड-कर्जत राष्ट्रीय महामार्ग 548 ब वरून सावळे गाव आणि पुढे हेदवली गावापर्यंत सात किलोमीटरचा रस्ता बनविण्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाले होते. 2021 मध्ये जानेवारी महिन्यात या रस्त्याचे मजबुतीकरण करण्याचे काम सुरु केले. आज वर्ष लोटले तरी रस्त्याचे काम सुरूच आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मजबुतीकरण कामे केल्यानंतर डांबरीकरण केले गेले. त्या डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर वर्षात खड्डे पडले आहेत. तर अजूनही रस्त्यातील साकव पुलांची कामे सुरूच आहेत, त्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे अधिकारी त्या ठिकाणी पोहचत नसल्याने रस्त्याचे काम करणारी श्री सिद्धिविनायक हि कन्स्ट्रक्शन कंपनी कडून रस्त्यावरील अर्धवट कामे पूर्ण करण्याची घाई केली जात असे दिसून येत आहे.

Exit mobile version