गणेशोत्सवापूर्वी काँक्रीटीकरण पूर्ण करण्याची मागणी
| तळा | वार्ताहर |
बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेले तळा बसस्थानकाचे काम हे अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. विविध समस्यांचा सामना करत असलेल्या तळा बसस्थानकाच्या कामाला 7 जुलैपासून सुरुवात करण्यात आली. बसस्थानकासमोरील काँक्रीटीकरण, संरक्षक भिंत व शौचालय तसेच त्यावरती विश्राम कक्ष असे संपूर्ण कामाचे स्वरूप आहे. मात्र, आजपर्यंत वीस दिवसांचा कालावधी उलटला असूनही संबंधित ठेकेदाराकडून केवल कातळ फोडण्याचेच काम करण्यात आले आहे. बसस्थानकाचे काम सुरू असल्यामुळे बसस्थानक चंडिका देवी चौकात हलविण्यात आल्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना संपूर्ण चढ चढून यावे लागत आहे. यावर्षी गणेशोत्सव लवकर येत असल्याने निदान बसस्थानकासमोरील काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करून गाड्या वरती आल्यास ऐन गणेशोत्सवात तालुक्यातील नागरिकांसह चाकरमान्यांची होणारी दमछाक थांबेल.







