। कर्जत । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण,आरोग्य व क्रीडा सुधाकर घारे यांच्या माध्यमातून केतन बेलोसे यांच्या प्रयत्नातून नेवाळी बौद्धवस्ती नळ पाणी योजनेचे काम पूर्ण झाले आहे,घरोघरी नळ जोडण्या देऊन केली पाणी टंचाई वर मात करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यातील बीड ग्रामपंचायत हद्दीतील मौजे नेवाळी बौध्दवस्ती येथील नागरिकांना खूप मोठ्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. ग्रामस्थांच्या व महिलांच्या मागणीनुसार गावातील ग्रामस्थ केतन बेलोसे यांनी सर्व बाब लक्षात घेऊन राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्याकडे नेवाळी बौद्धवस्ती येथील नळ पाणी योजना पूर्णपणे नादुरुस्त झाली असून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
सुधाकर घारे यांनी तत्काळ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दहा लक्ष निधी मंजूर करून देण्यात आला. नेवाळी बौद्धवस्ती येथील नागरिकांच्या घराघरात नळ जोडण्या देऊन कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर केलेली आहे. सदरील योजना पूर्ण करणेसाठी नेवाळी बौद्धवस्ती येथील युवक वर्ग, महिला, ग्रामस्थ यांनी मोठे सहकार्य केले व सदरील काम पूर्ण करून घेतले. महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरला असल्याने महिलांध्ये मोठ्या प्रमाणात आनंद पाहायला मिळत आहे.