। मुरुड जंजिरा । सुधिर नाझरे ।
मुरुड शहरातील दत्तवाडी परिसरात पल्सर २२० या मोटारसायकलने मुरुडवरून शीघ्रे या ठिकाणी जात असताना झालेल्या अपघातात २२ वर्षीय अतिश नंदकुमार मिसाळ या तरुणाचा मृत्यू झाला. गाडी रस्त्यावरील दगडावर आदळल्याने शीघ्रे येथील अतिश नंदकुमार मिसाळचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, मुरुड येथून शीघ्रे परिसराकडे पल्सर २२० एमएच ०१ सीबी १६४५ या मोटर सायकलने अतिश मिसाळ व अशोक धोंडू पाटील हे दोघेही जात होते. दत्तवाडी परिसरात आले असताना गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या संरक्षक दगडावर जोरात आदळली. या अपघातात चालक अतिश मिसाळ याचे दगडावर डोके आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यामागे बसलेला अशोक पाटील हा जखमी झाला आहे. जखमीला तातडीने अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील इलाजासाठी पाठवण्यात आले आहे. अतिशय अपघाती मृत्यू झाल्याने शीघ्रे गावात शोककळा पसरली आहे.