ग्रामस्थांनी घेतला आंदोलनाचा निर्णय
| नेरळ | प्रतिनिधी |
सावळे गावासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या जलजीवन मिशन मधून नळपाणी योजना मंजूर झाली. 2021 मध्ये या गावासाठी पाणी मिळावे यासाठी 93 लाख रुपये खर्चाची नळपाणी योजना मंजूर झाली होती. हि योजना कर्जत तालुक्यात असताना ठेकेदार मात्र मुरुड तालुक्यातील असल्याने ठेकेदाराचे दुर्लक्ष झाल्याने नळपाणी योजनेचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. त्यात या नळपाणी योजनेचे आणलेले पाईप हे नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी जिल्हा पाणी पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, पाणी पुरवठा विभागाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा बदल केले गेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सावळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत आक्रमक होत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. अनेक महिने रखडलेल्या नळपाणी योजनेचे काम तात्काळ सुरु करून पूर्ण करावे आणि नित्कृष्ट जलवाहिनी तसेच जलकुंभ यांची कामे नव्याने व्हावी अशी मागणी केली.
या ग्रामसभेत सावळे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थ बाजीराव दळवी, सत्यवान धुळे, सचिन मोडक, रमेश दळवी, रघुनाथ मोतीराम धुळे, रमेश धुळे, नारायण धुळे,रोहिदास धुळे, रामदास मोडक,पंढरीनाथ मोडक, संदीप धुळे, सखाराम धुळे, महेंद्र धुळे, उत्तम दळवी, पांडुरंग धुळे, नरेंद्र विरले, मोहन धुळे, भानुदास दळवी, सरिता धुळे,दर्शना धुळे, वैभव धुळे, कैलास धुळे, सुशीला धुळे, रविशा धुळे, मानसी धुळे, अरुणा धुळे, रेखा धुळे, दीपक भालके, अशोक धुळे, हर्षल मोडक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.







