मोदी सरकारकडून श्रेय लाटण्याचे काम: उल्का महाजन

| खारेपाट | वार्ताहर |

संयुक्त पुरोगामी लोकशाीही आघाडीने तयार केलेल्या कायद्यांचे श्रेय मोदी सरकार घेत आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी अलिबाग येथील काँग्रेस भुवन येथे रायगड जिल्हा काँग्रेस आढावा बैठकीच्या वेळी व्यक्त केले.

पुढे म्हणाल्या की, सध्या देशात बेरोजगारी, महागाई, जनतेवर कर्जाचा बोजा, मोठ्या संख्येने खासगीकरण यामुळे देशापुढे भीषण समस्या भेडसावत आहे. तसेच जाती भेद, धर्मा-धर्मांमध्ये भांडणे लावली जातात. तसेच महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. तसेच, देशाचे संविधान वाचवायचे असेल तर सत्ताधारी पक्षाला सत्तेतून पायउतार करावे लागेल. तसेच शेतकर्‍यांपुढेही भीषण परिस्थिती असून, भविष्यात शेतकरी देशोधडीला लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली. अदानी व अंबानी यांना फायदा होईल, अशी धोरणे राबविली जात आहेत. देशात विषमता वाटत आहे, अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी जनसमुदायाला मार्गदर्शन केले.

त्या पुढे म्हणाल्या की, मी कुठल्याही पक्षाची पदाधिकारी नाही, तसेच या देशाचे संविधान टिकणे काळाची गरज आहे, यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. उल्का महाजन यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत व अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर यांनी त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत, अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, राजाभाऊ ठाकूर, अ‍ॅड. श्रध्दा ठाकूर, सुनील थळे उपस्थित होते.

Exit mobile version