तीन जणांवर गुन्हा दाखल
। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत नगर परिषद क्षेत्रात मौजे गुंडगे येथे ही अरिहंत डेव्हलपर्सची साईट सुरू आहे. या साईडवर कामगाराला शॉक लागून त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 10 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास मौजे गुडंगे गावच्या हद्दीतील अरिहंत डेव्हलपर्स बांधकाम साईडमधील मयत वय 20 वर्षे, रा.रामोगुडा पुरोनापाणी, चंद्रगिरी ता.आर उद्देगिरी जि.गजपती, राज्य ओडिसा सध्या रा. अरिहंत लेबर कॉलनी गुंडगे ता.कर्जत हा काम करीत असलेल्या अरिहंत डेव्हलपर्स यांच्या साईडवर व्हायबरेशन मशीन सोबत जोडलेल्या पाईपच्या लोखंडी निडलचा शॉक लागुन त्यात त्याचा मृत्यु झाला. याबाबतील या बांधकाम साईडवरील तीन काँन्टॅक्टरने सदर मृत इसमास सुरक्षेचे कोणतेही साधन दिले नसल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या तीघांवर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 250/2021 भा.दं.वि.क.304, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कर्जत पोलीस ठाणे करीत आहेत.