‌‘वर्कर’ने केले क्रिकेटला अलविदा

| वेंलिग्टन | वृत्तसंस्था |

न्यूझीलंडचा फलंदाज जॉर्ज वर्करने वयाच्या 34 व्या वर्षी व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने गुंतवणूक सेवा फर्ममध्ये नोकरी करण्याची ऑफर स्वीकारली आहे. व्यावसायिक क्रिकेटमधील 17 वर्षांच्या पूर्ण प्रवासानंतर, मी निवृत्ती जाहीर करत आहे. माझ्या आयुष्यातील अविश्वसनीय अध्याय संपला आणि एका नवीन प्रवासाची सुरुवात झाली आहे, असे वर्करने सांगितले. वर्करने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीला सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून सुरुवात केली आणि ऑकलंडसह हा प्रवास संपुष्टात आला.

वर्करने त्याच्या अल्पशा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दित 2025 ते 2018 या काळात 10 एकदिवसीय व 2 टी-20 सामने खेळले आणि त्यात अनुक्रमे 272 व 90 धावा केल्या आहेत. 2015 मध्ये त्याने झिम्बाब्वे टी-20 दौऱ्यावरून पदार्पण केले आणि 38 चेंडूंत 62 धावा करून ‌‘मॅन ऑफ दी मॅच’ हा पुरस्कारही जिंकला होता. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय संघात पदार्पण केले आणि त्यानंतर तो आयर्लंड व वेस्ट इंडिजविरुद्धही एकदिवसीय सामना खेळला होतो. वर्करने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 60, टी-20मध्ये 42 आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 58 बळी घेतले आहेत.

Exit mobile version