बेक कंपनीच्या मनमानीमुळे कामगाराचा संसार उद्ध्वस्त

विक्रांत जंगमयांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

| चणेरा | प्रतिनिधी |

कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे विक्रांत जंगम याचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी दि.26 रोजी प्रजासत्ताक दिनी आपले हक्क मागण्याकरिता त्याची तारेवरची कसरत पहायला मिळणार आहे. कामावरून काढल्याने त्याच्यावर घर विकण्याची वेळ आली. कुटुंब स्थीर नसल्याने ते उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावार असताना आता त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
विक्रांत रमाकांत जंगम हा बेक केमिकल्स प्रा. लि. धाटाव या कंपनीचा कामगार आहे. कंपनीत अचानक चक्कर येऊन पडल्याने त्याच्यावर जून 2018 साली ब्रेन ट्युमर या आजाराचे निदान करण्यात आले होते. त्या अनुषंगाने या आजारावर उपचार करण्यासाठी आदित्य बिरला मेमोरियल हॉस्पिटल पुणे येथे ब्रेन ट्युमर या आजारासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. ती शस्त्रक्रिया पूर्णतः सफल झाली नव्हती, त्यादरम्यान त्याच्या शरीराचे संतुलन गमावले होते. काहीअंशी चालण्यासाठी अपंगत्व आले. त्यानंतर कंपनी व्यवस्थापनाच्या सहकार्याने याच सेम कंडीशनला जंगम पुन्हा 17 डिसेंबर 2018 रोजी कंपनीच्या सेवेत कार्यरत होण्यासाठी रुजू झाले. यादरम्यान, कंपनी व्यवस्थापनाने त्यांना हालचाली करण्याकरिता स्टीकचा वापर करण्याची परवानगीही दिली होती, अशा परिस्थितीत त्याने जून 2021 पर्यंत म्हणजेच जवळपास अडीच वर्षे यशस्वीरीत्या कंपनीत काम केले. यादरम्यान ते कुठल्याही प्रकारची कामात दिरंगाई न करता नेमून दिलेले काम करत होते. परंतु, त्याचे पहिले ऑपरेशन अयशस्वी झाले असल्याने त्यांच्या शरीराचे गेलेले संतुलन मात्र अद्याप पूर्णतः बरे झालेले नाही. त्यामुळे सेफ्टी अनुषंगाने त्याला चालण्यासाठी स्टिकचा वापर करावा लागतो. या एकाच कारणामुळे कंपनी व्यवस्थापनाने त्यांना कामावर घेण्यास नकार दिला आहे.

कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर क्यू. सी. या पदावर कार्यरत असल्यामुळे त्याचे संपूर्ण काम हे बसून म्हणजेच केवळ कार्यालयीन कामकाज आहे. त्यामुळे स्टिक वापरण्याचा त्याच्या कामाशी कुठल्याही प्रकारचा कसलाही संबंध येत नाही. असे असताना कंपनी प्रशासनाने त्याला घरी बसविणे योग्य वाटत नसल्याने त्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.


कंपनीच्या वतीने आम्ही त्यांना कायमस्वरूपी तीन ते चार हजार रुपयांची मदत करू शकतो. पण कामावर घ्यायचे असेल तर काठीचा आधार न घेता कामावर आले तर कामावर घेऊ.

अतुल आठवले, व्यवस्थापक, बेक केमिकल कंपनी धाटाव
Exit mobile version