टाटा स्टिलविरोधात कामगार आक्रमक

आ. थोरवेंच्या नेतृत्वात धडक मोर्चा

| रसायनी | वार्ताहर |

आ. महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कामगारांना न्याय मिळावा, यासाठी टाटा स्टील कंपनीवर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. स्थानिकांवर अन्याय झाला तर खपवून घेणार नाही, असा इशारा आ. थोरवे यांनी यावेळी कंपनी प्रशासनाला दिला.

टाटा स्टिल कंपनीने स्थानिक कामगारांना कामावरून कमी केल्याने तसेच बाहेरील नवीन कामगार भरती करताना स्थानिकांना विचारात घ्यावे यासाठी आ. थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली सावरोली ग्रामस्थ व पदाधिकार्‍यांच्यावतीने टाटा स्टिल प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी कंपनी प्रशासनाला आ. थोरवे यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटल दिला आहे. कंपनीने स्थानिक कामगारांना नोकरीवरून कमी केले आहे त्यांना पुन्हा कामावर घ्यावे. कामगार भरती करताना स्थानिकांना डावलू नये तसेच स्थानिक कामगारांवर अन्याय केल्यास आम्ही शांत राहणार नसल्याचे आ. महेंद्र थोरवे यांनी बोलताना सांगितले.

Exit mobile version