| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी येथील हायटेक इंटरनॅशनल कंपनीमध्ये तसेच कंपनीसमोर दुचाकीच्या अपघाताच्या कारणावरून कामगारांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हायटेक इंटरनॅशनल कंपनीतील एक कामगार मोटारसायकलवरून जात असताना त्याच्या दुचाकीचा एका स्कूटीशी अपघात झाला. या घटनेच्या कारणावरून आरोपींनी आपसात संगनमत केल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपींनी प्रथम साक्षीदाराला लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच, कंपनीमध्ये विनापरवानगी प्रवेश करून इतर साक्षीदारांना झाडू व हाताबुक्क्यांनी मारहाण केली आणि दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.
