क्षयरोग दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन

| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महानगरपालिका आणि एमजीएम वैद्यकिय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 20 मार्च रोजी एमजीएम वैद्यकिय महाविद्यालयामध्ये आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.यावेळी महापालिका मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. प्रसाद वायंगणकर, डॉ. प्रदीप पोतदार, डॉ.अरूणकुमार भगत, डॉ.विजय कमले, डॉ.अविनाश जाधव, डॉ.येवले, डॉ. ठोकळ, महापालिका वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.

24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्‍वभूमीवरती क्षयरोग मोहिमेअंतर्गत पनवेल महानगरपालिका आणि एमजीएम वैद्यकिय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 20 मार्च रोजी कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी तज्ज्ञामार्फत क्षयरोगा संदर्भात करण्यात येणार्‍या चाचण्या, प्रतिकार, उपचार ,पोषक आहार , निक्षय मित्र याबाबत खाजगी वैद्यकिय व्यवसायिकांसाठी क्षयरोग दूरीकरणाबाबत मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

Exit mobile version