तळा आरोग्य केंद्रात कार्यशाळा

। तळा । वार्ताहर ।

तळा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळा येथे जंतनाशक मोहिमेंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय जंतनाशक दिन (एन.डी.डी) हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी 2015 मध्ये सुरु करण्यात आला आहे.

राष्ट्रीय जंतनाशक दिन हा कार्यक्रम फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात राज्य विशिष्ट व्याप्तीवर आधारिता शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये एकाच निश्‍चित दिवशी जंतनाशक गोळ्या देऊन दोनदा घेण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणार्‍या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेमधील अंतर सहा महिन्यांपेक्षा जास्त नसावे. म्हणूनच, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम डिसेंबर 2024 मध्ये आयोजित करण्यात आली आहे.

सर्व शासकीय शाळा/शासकीय अनुदानित शाळा, सर्व खासगी अनुदानित शाळा, सर्व खासगी इंग्रजी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रथम वर्षाचे विद्यार्थी, आयटीआय, सर्व ग्रामीण व शहरी अंगणवाडी व मिनी अंगणवाडी केंद्रे आदी ठिकाणी जाऊन हा उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजेंद्र मोधे, वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक नरेश नांदगावकर, आरोग्य सेविका किशोरी करंजे यांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version