उदया प्रकल्प अंतर्गत कार्यशाळा

। अलिबाग । वार्ताहर ।

भारतीय उद्योजकता विकास संस्था, ई.डी.आय.आय व टाटा कम्युनिकेशन्स लि. मुंबईद्वारा आयोजीत उदया प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षित माहिला उद्योजिकांकरीता एक दिवसीय बी.टु.बी. कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी (दि.23) सकाळी 10 ते 1 या कालावधीमध्ये आदर्श पतसंस्था सभागृह अलिबाग येथे करण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत भारतीय उद्योजकता विकास संस्था (ई.डी.आय.आय.) द्वारा प्रशिक्षित माहिला अद्योजिकांना आपल्या वस्तुला बाजारपेठ मिळावी, त्यांच्या वस्तुची जाहिरात व्हावी या उद्देशाने सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेमधून महिला उद्योजिकांना आपले वस्तु विक्री व जाहिरातींकरीता निश्‍चीतच फायदा होऊ शकतो. या कार्यशाळेला उदया प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या व आपले उदयोग सुरू करणार्‍या महिलांनी उपस्थित राहून कार्यशाळेचा फायदा घ्यावा, असे आवाहन ई.डी.आय.आय. प्रकल्प कार्यालय अलिबागद्वारे करण्यात आले आहे.

Exit mobile version