टी.टी. पाटील विद्यामंदिरात वर्ल्ड बुक डे साजरा

| चिरनेर | प्रतिनिधी |

जे.एस.डब्ल्यू फाऊंडेशन आणि मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील पेण आणि अलिबाग तालुक्यांमधील 26 शाळांमध्ये जे.एस.डब्ल्यू ॲस्पायर प्रोजेक्ट डोलवी हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये आणि कम्युनिटीमध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. याचाच भाग म्हणून टी. टी. पाटील विद्यामंदिर तिनविरा येथे वर्ल्ड बुक डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी टी.टी.पाटील विद्यामंदिर तिनविरा शाळेचे मुख्याध्यापक ततरे, शिक्षक, विद्यार्थी तसेच बालपंचायत सदस्य उपस्थित होते. सर्वप्रथम मुलांना वर्ल्ड बुक डे बद्दल माहिती सांगण्यात आली. त्यानंतर वाचनाचे महत्त्व सांगण्यात आले. वर्ल्ड बुक च्या निमित्ताने मुलांना बुक मार्क तयार करणे ही अँक्टिव्हिटी घेण्यात आली. मुलांना बुक मार्क ही संकल्पना खूप आवडली. त्यामुळे आपण आपल्या पुस्तकांची वह्यांची काळजी कशाप्रकारे घेऊ शकतो हे समजले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बसचे डॉ.प्रगती पाटील (मॅनेजर), दर्शना पाटील (अकॅडमिक एज्यूकेटर), मीनल धुमाळ (लाईफ स्किल एज्यूकेटर), रश्मी पाटील (सी.सी.) यांनी विशेष मेहनत घेतली.

Exit mobile version