मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह

| कोर्लई | वार्ताहर |

ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा म्हणजेच दि. 1 ते 7 ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून देशात साजरा केला जातो. हा सप्ताह साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना स्तनपनाचे फायदे आणि आवश्यकतेबद्दल जागरूक करणे हा असून, त्याचाच भाग मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताहनिमित्ताने वैद्यकीय अधीक्षक डॉ.उषा चोले यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

जागतिक स्तनपान सप्ताह वेगवेगळ्या थीम अंतर्गत साजरा केला जातो. यावर्षी या सप्ताहाची थीम उश्रेीळपस ींहश सरि: इीशरीींषशशवळपस र्ीीििेीीं षेी रश्रश्र असे आहे. याचा अर्थ, सर्व स्तरावरील मातांसाठी स्तनपान सुलभ करणे हा यावर्षीचा उद्देश आहे. बाळंतपणानंतर शक्य तेवढे लवकर स्तनपान सुरू केले पाहिजे. पहिल्या सहा महिन्यांपर्यंत अमृतासमान आईच्या दुधाव्यतिरिक्त दुसरे कोणतेही अन्न व पाणी देऊ नये. बाळाची भूक भागेल इतकं दूध मातांना निसर्गातः निर्माण करता येते.

स्तनपान हे आई व बाळ दोघांसाठी उपयुक्त आहे, त्यामुळे स्तनपानाविषयी गैरसमज दूर करून स्तनपानाला कौटुंबिक सामाजिक स्तरावर प्रोत्साहन दिले पाहिजे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. उषा चोले यांनी दिली.

Exit mobile version