| तळा | वार्ताहर |
जागतिक दिव्यांग दिन वानस्ते ग्रामपंचायतीत सकाळी 11.30 वाजता साजरा करण्यात आलात्र यावेळी बारा दिव्यांग बांधवांना गुलाब पुष्प देऊन व दिव्यांग कल्याण निधीतून खुर्ची वाटप केले. यावेळी दिव्यांग दिनाचे महत्त्व विशद केले.
दिव्यांगाचे मनोबल वाढावे, मनातील न्यूनगंड काढून आपण सुदृढ असल्याची जाणीव करून भावना निर्माण व्हावी, दिव्यांग (अपंग) नसून तो सुदृढ आहे, इतरांनी त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. आज दिव्यांगावर मात करून विविध ठिकाणी नोकरी व्यवसाय करीत असून, भरारी घेत आहेत. याच उद्देशाने जागतिक दिव्यांग दिन साजरा करीत आहोत, असे ग्रामसेविका मनीषा कुंभार यांनी सांगितले. यावेळी प्रशासक डी.डी. झोरे यांच्या अधिपत्याखाली नियोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांग बांधव, सदस्य, लेखनिक, शिपाई उपस्थित होते.