विश्व फुटबॉलला मिळाला नवीन हिरा

नॉर्वेची गोल मशीन एर्लिंग हालँड; नॉर्वे पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत

| मुंबई | प्रतिनिधी |

फिफा वर्ल्डकप 2026चा थरार सुरू असून दोन दिग्गज खेळाडूंचे संघ बाहेर पडले आहेत. ब्राझीलच्या पराभवानंतर मैदानातच नेमार ज्युनियरने आपल्या निवृत्तीची घोषणा केली. तर पोर्तुगालच्या पराभवाने क्रिस्तियानो रोनाल्डोचाही प्रवास इथेच संपला. कारण त्याचा हा शेवटचा वर्ल्ड कप होता. आता सर्वात जास्त चर्चा नॉर्वेच्या एर्लिंग हालँड याची होत आहे. पठ्ठ्याने केलेल्या दोन गोलमुळे नॉर्वे संघाने इतिहासात पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली. चित्त्यासारखा चपळ असलेला एर्लिंग हालँड गोल मशिन म्हणून ओळखला जातोय.

फिफा अंडर-20 वर्ल्ड कपच्या गट फेरीतील सामन्यात नॉर्वेचा सामना होंडुराशची होता. 18 वर्षांचा एर्लिंग हालँड उंच आणि तगडा स्ट्रायकर मैदानावर उतरला. या सामन्यात नॉर्वेने 12-0 विजय मिळवला होता. यामधील 9 गोल एकट्या एर्लिंगने केले होते. या 9 गोलमुळेच तो त्या टूर्नामेंटचा गोल्डन बूट विजेता झाला होता. एर्लिंग हालँडने आजवरच्या करिअरमध्ये जुलै 2026 पर्यंत क्लबसाठी 402 मॅचमध्ये 317 गोल आणि नॉर्वे संघासाठी 54 मॅचमध्ये 62 गोल केले आहेत, म्हणजे एकूण 379 गोल. त्याने मोल्डेसाठी 18, साल्झबर्गसाठी 29, डॉर्टमंडसाठी 86 आणि मँचेस्टर सिटीसाठी 162 गोल केले, ज्यात प्रीमियर लीगचे 112 गोल आणि चॅम्पियन्स लीगचे 36 गोल आहेत. आपल्या करियमध्ये प्रीमियर लीग टायटन्स, चॅम्पियन्स लीग टायटन्स आणि 3 गोल्डन बूट मिळवले. पण एक गोष्ट अजूनही मिसिंग होती. ती म्हणजे नॉर्वे संघ 1998 नंतर वर्ल्डकपमध्ये एकदाही क्वालिफाय करू शकला नव्हता. नॉर्वेचा वर्ल्डकपमधील प्रवास नॉर्वे संघाचा पहिला सामना इराकसोबत होता. हा सामना 4-1ने नॉर्वेने जिंकत दमदार सुरूवात केली. यामध्ये पहिले दोन गोल एर्लिंग हालँड याने केले. दुसरा सामना सेनेगलवविरूद्ध झाला यामध्येही हालँडने दोन गोल करत इतिहास रचला. पहिल्या वर्ल्ड कपमध्ये दोन सामन्यात दोन-दोन गोल करणारा एर्लिंग हालँड गेल्या 50 वर्षांतील दुसरा खेळाडू ठरला. तिसऱ्या सामन्यामध्ये फ्रान्सने 1-4 ने मात करत नॉर्वेला पराभवाचा पहिला झटका दिला. त्यानंतर चौथा सामना ब्राझीलसोबत होता, कोणी विचारही केला नव्हता की पाचवेळा विजेत्या राहिलेल्या ब्राझीलचा पराभव होईल. नॉर्वेकडून हालँडने दोन गोल करत संघाला जिंकवले. जेव्हा जागतिक फुटबॉलमधील अनपेक्षित निकालांची चर्चा होईल यामध्ये आता फिफा वर्ल्ड कप 2026 मधील ब्राझीलविरुद्ध एर्लिंग हालँड केलेल्या कामगिरीची नक्कीच आठवण काढली जाईल.

Exit mobile version