अयोध्येत विश्‍वविक्रमी दिपोत्सव

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आगामी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अयोध्येत विश्‍वविक्रमी दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या दिपोत्सवाच्या पाचव्या वर्षी रामपदीवर एकाच वेळी 7 लाख 51 हजार दिवे प्रज्वलित करून विश्‍वविक्रम करण्यात आला आहे.
2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी आदित्यनाथ सरकारचा हा शेवटचा मोठा कार्यक्रम असण्याची शक्यता आहे. दीपोत्सवाचे प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसह केनिया, व्हिएतनाम आणि त्रिनिदाद-तुबागो येथील राजनैतिक अधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version