अनिरुद्ध खेडेकरच्या छोट्या रांगोळीचा विश्‍वविक्रम!

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील नांदगावच्या अनिरुद्ध संदिप खेडेकरफ याने जगातील सर्वात लहान म्हणजेच 2.2 सेमी व्यास असणार्या वर्तुळाकारात चौदा विद्या आणि चौषष्ठ कलांचा अधिपती असलेल्या आपल्या सर्वांचेच आराध्य दैवत श्रीं ची म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची पोर्ट्रेट रांगोळी यंदाच्या मिती माघ शुद्ध प्रतिपदा चतुर्थी रोजी साकार करून जागतिक पातळीवर दखल घेतल्या जाणार्‍या महार्वर्ड वर्ल्ड रेकॉर्ड, लंडनफ अंतर्गत विश्‍वविक्रम प्रस्थापित केला आहे.

श्री क्षेत्र बल्लाळेश्‍वर, पाली, जि.रायगड येथील श्रीं च्या मुर्तीची प्रतिकृतीची असून सध्या चलनात असलेल्या 1 रुपयाच्या नाण्याच्या आकारात सदर रांगोळी साकारण्यात आली आहे. आंग्लवर्षीय गणनेनुसार, दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी 10 मिनिटांहून किंचित कमी कालावधीत ही पोर्ट्रेट रांगोळी साकारण्याची मविश्‍वविक्रमीफ नोंद करण्यात आली आहे. रांगोळी साकारण्यासाठी 2.8 ग्रॅम रांगोळीचा वापर झाला असून ही विश्‍वविक्रमी रांगोळी साकारण्यासाठी अनिरुद्ध चे रांगोळी क्षेत्रातील प्रथम गुरु श्री. सतिश जोशी अन् त्याचे बंधू रांगोळीकार, जयंत शिगवण (व्यावसायिक पटकथालेखक – कला दिग्दर्शक) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अनिरुद्धने यापूर्वी पाण्याखालील सर्वात छोटी रांगोळी काढून 2021 ला एशिया बुक ऑफ रेकॉर्डस् व इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये आपले नाव कोरले आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Exit mobile version