रेवदंडा येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात

| रेवदंडा | वार्ताहर |

जागतिक ज्येष्ठ दिनाचे औचित्य साधून दि. 4 ऑक्टोबर रोजी रेवदंडा येथील काशिनाथ बनिया उद्यानातील विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिक संस्था, रेवदंडा या संस्थेची सभा अध्यक्ष सुभाष चिटणीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

प्रारंभी राष्ट्रगीत व राज्यगीताने सभेची सुरुवात झाली. मागील महिन्यात ज्यांचे वाढदिवस होते, त्यांना शुभेच्छापत्रे व सोनचाफ्याची फुले देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले. तद्नंतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढवा घेण्यात आला. दर मासिक सभेत बी.पी., वजन, शुगर लेव्हर तपासली जाते. तशी या सभेतही सर्वांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, आ. जयंत पाटील यांची रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमनपदी सहाव्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही यावेळी घेण्यात आला. जागतिक दिनाचे महत्त्व व संत ज्ञानेश्वरांनी रचलेला ओव्यांचा भावार्थ अनेकविध दाखले देत रोहिदास म्हात्रे यांना विशद केला. सभासदांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून एक छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये संस्थेचे सहसचिव चंद्रकांत झावरे, कृष्णा खुदोळ, श्रीराम केकर यांनी भावगीते व भक्तीगीते सादर करुन सभासदांचा आनंद द्विगुणित केला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता चिटणीस, सरोज वरसोलकर, अलका देवधर, रविकांत राऊत, विलास घोसाळकर, नंदन गुरुजी, सुरेश खडपे, भगवान तांबडकर यांनी मेहनत घेतली. शेवटी प्रकाश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Exit mobile version