जागतिक कुस्ती महासंघाचा दणका

भारतीय कुस्ती महासंघाची सदस्यत्व रद्द

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

जागतिक कुस्ती महासंघाने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्‍व रद्द केले आहे. 45 दिवसांत निवडणुका होऊ न शकल्याने डब्लुएफआयचे सदस्यता रद्द करण्यात आले. त्यामुळे आगामी विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू भारताच्या झेंड्याखाली खेळू शकणार नाही. आता 16 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रतेसाठीच्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू तटस्थ झेंड्याखाली सहभागी होऊ शकतात.

भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका 12 ऑगस्ट रोजी होणार होत्या, परंतु पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने मतदानाच्या एक दिवस आधी निवडणुकीला स्थगिती दिली होती. आसाम उच्च न्यायालयानेही भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. याआधी 11 जुलै रोजी निवडणुका होणार होत्या, परंतु आसाम कुस्तीगीर संघटनेने आपल्या मान्यतेबाबत न्यायालयात धाव घेतली. ज्याच्या सुनावणीवर आसाम उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. त्यानंतर ऑगस्टमध्येही निवडणुका होऊ शकल्या नाहीत.

खरं तर भारतातील कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरोधात आंदोलन केल्यापासून भारतीय कुस्ती संघटनेवरही यांचा परिणाम झाला. विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यादरम्यान त्यांचे आंदोलन चार-पाच महिने चालू होते. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांना निलंबित केले. पदाधिकाऱ्यांना निलंबित केल्यानंतर महासंघाचे काम तडकाफडकी समिती पाहत होती.

पूर्वी फेडरेशनच्या निवडणुका 12 ऑगस्टला होणार होत्या. अध्यक्षपदासाठी 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अध्यक्षपदासाठी एका महिलेनेही अर्ज दाखल केला होता. अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करणाऱ्या संजय सिंह यांच्याबाबत बराच गदारोळ झाला होता. संजय हा ब्रिजभूषण सिंहचा जवळचा असल्याचे बोलले जात होते. निवडणुकीत त्याच्या उतरल्यावर आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी नाराजी व्यक्त केली होती.

Exit mobile version