| उरण | प्रतिनिधी |
धुतूम ग्रामपंचायतीच्या कार्यालयाची इमारत जिर्ण झाल्याने ग्रामपंचायतीच्या सुचिता ठाकूर यांनी सदर इमारतीचे नव्याने नूतनीकरण करण्यात आले. शिवजयंतीच्या मुहूर्तावर नूतनीकरण करण्यात आलेल्या धुतूम ग्रामपंचायतीच्या कार्यालयात गुरुवारी (दि19) श्री गणेश पुजन व छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन सुचिता ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच धुतूम ग्रामपंचायतीचे प्रथम सरपंच स्व.रामदासशेठ नारायण ठाकूर यांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी महेंद्र घरत, डॉ. मनिष पाटील, प्रियांका मढवी, निर्मला घरत, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सजैराव पाटील, विस्तार अधिकारी विनोद मिंडे, नरेश घरत, स्मिता ठाकूर, रविनाथ ठाकूर, प्रकाश ठाकूर, प्रेमनाथ ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, कविता पाटील, सुचिता कडू, अनिता ठाकूर, करिष्मा ठाकूर, नागनाथ घाडगे, संदिप काळे, शंकर ठाकूर, अर्चना ठाकूर, नारायण ठाकूर, दिपक मढवी, साहिल सह ग्रामस्थ उपस्थित होते.







