कुस्तीपटू विनेश फोगट सुवर्णपदकाची मानकरी


नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगटने शानदार प्रदर्शन करत भारताच्या झोळीत आणखी एक सुवर्णपदक ठेवले आहे. पोलंड ओपनमध्ये 53 किलो वजनी गटात शुक्रवारी झालेल्या सामन्यात विनेशने विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. या सुवर्णपदकामुळे तिची टोकियो ऑलिम्पिकची तयारी योग्य दिशेने चालली आहे, हे दिसून येते. यंदा होणार्‍या ऑलिम्पिकपूर्वी विनेशला जास्त सराव करता आलेला नाही. 26 वर्षीय विनेशचे हे हंगामातील तिसरे विजेतेपद आहे. मार्चमध्ये मॅटिओ पेलिकोन आणि एप्रिलमध्ये आशियाई स्पर्धेतही तिने सुवर्णपदक जिंकले. या विजयामुळे विनेश टोकियो ऑलिम्पिकमधील अव्वल मानांकित कुस्तीपटू होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version