| टोक्या | वृत्तसंस्था |
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची दावेदार मानल्या जात असलेल्या विनेश फोगाटला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला आहे. बेलारुसच्या महिला कुस्तीपटू तिला 9-3 असं नमवत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
विनेश फोगाटनं क्वार्टर फायनल गमावली आहे. यामुळं तिचं गोल्ड मेडलचं स्वप्न भंगलं आहे. फ्री स्टाइलमध्ये विनेश फोगाटकडून पदकाची अपेक्षा होती. कारण, ती या गटात नंबर एकवर होती. विनेश त्या खेळाडूंमध्ये होती, जिनं टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं होतं. आज हार पत्कारावी लागली असली तरी विनेशकडे अद्याप कांस्यपदक जिंकण्याची संधी आहे.