। नवीन पनवेल । वार्ताहर ।
27 ते 29 जुलैदरम्यान हरिद्वार उत्तराखंड येथे नववी स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन नॅशनल गेम्स स्पर्धा पार पडल्या. यात पोलीस मुख्यालय कळंबोली कुस्ती संकुल येथील कुस्ती खेळाडू यांनी वेगवेगळ्या वजनी गटात, 23 सुवर्णपदक, तर 4 रौप्यपदक प्राप्त करून जिल्हयाचे नाव लौकिक केले.
कुस्ती मार्गदर्शक सहायक पोलीस आयुक्त सरदार नाळे, संपत्ती येळकर, संजय चव्हाण, श्रीहरी तरंगे, प्रदीप जाधव, दिपक वारखडे, शुभम मुद्दमे, अर्चना पाटील यांचे खेळाडूंना मार्गदर्शन लाभले. पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह, सहपोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, पोलीस उपायुक्त अभिजीत शिवतारे मुख्यालय, पोनि कृष्णा धामापूरकर, पोउपनि रवींद्र पडवळ यांचे सहकार्य लाभले.
सुवर्णपदक विजेते – स्वराज शिरसागर, अभिनव नाळे, वेदांत येळकर, तनिष्क भिल, श्लोक राऊत, समर्थ गोवे, मानव यादव, संस्कार शिंदे, वेदांत हावळे, शिवम सत्रे, सोहम वसेकर, स्वप्निल लावंड, कुणाल पाटील, सुशांत रेपाळे, दीपक बनगर, सचिन देवडकर, शौर्य कोळेकर, संस्कृती खरे, असलेशा शिंदे, ऐश्वर्या गोरे, आदिती वचकल.
रौप्यपदक विजेते – हर्षल नाईक, वीरेंद्र घेरडे, आदर्श गोरे, तनिष्क चंदनशिवे, वेदांत चिकणे.