लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा

। उरण । वार्ताहर ।
चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, आणि पाटील कुटूंबीय भेंडखळ यांनी गणपती निमित्ताने घेतलेल्या आई या विषयावर लेखन स्पर्धेचा बक्षीस सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत स्वप्नील घरत प्रथम, नीतिशा पाटील द्वितीय, मीना म्हात्रे तृतीय, सायली पाटील चतुर्थ असे मानकरी ठरले आहेत. सदर स्पर्धेचे परीक्षक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांनी केले. कार्यक्रमासाठी पाटील कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी विजेत्यांना पाटील कुटूंबाचे ज्येष्ठ दिगंबर पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष तुषार ठाकूर यांच्या हस्ते संस्थेचे प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देण्यात आले.

Exit mobile version