अलिबाग महावितरणची मुजोरी

। अलिबाग । वार्ताहर ।
सध्या वीज बिल वसुलीच्या नावाखाली महावितरण सर्वसामान्य ग्राहकांचे वीजकनेक्शन तोडणे,पूर्व सचूना न देताच त्यांचे मीटर काढून नेणे, वर्षभर घर बंद असतानाही सबंधीत ग्राहकाने दोन वेळा घर बंद असल्याचा अर्ज दिलेला असतानाही त्या अर्जाला केराची टोपली दाखवत ग्राहकाला एकदा तीन हजार चारशेव पुन्हा चार हजार शंभर रुपयांचे बिल दिले.

चुकिचे आलेले बिल न भरल्याने सरळ कोणतीही पर्वू सर्वचूना न देताच मिटर काढून नेला. बाहेरगावी असलेला घरमालक रात्री घरी आल्यावर त्याचा मिटर गायब होता. रात्र त्यांना अधांरात काढावी लागली. सकाळी महावितरणचे कार्यालय गाठल्यावर मिटर त्यांनीच काढल्याचे कळले. विचारणा केल्यावर तेथील कर्मचर्मार्‍याने बिल बरोबर आहे, त्वरित मिटर बसवण्याच्या चार्जेस सहबिल भरा असे अरेरावी करीत फर्मावले.अनेक वेळा बिल चुकिचे आहे असा अर्ज दिला होता, असे पटवनू सांगितल्या नंतर बिल दरूुस्त केले. मात्र ऊर्जा खात्याला आणि महाराष्ट्र शासनाला त्याचे काहीच सोयरसतुक नाही असे अनभुवास येत आहे.

Exit mobile version