। पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुकास्तरीय आगरी प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धा नुकत्याच पालीतील पंचायत समिती कार्यालयासमोरील क्रीडांगणात संपन्न झाल्या. या स्पर्धेत यश अँड ओम वॉरिअर्स संघाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यश अँड ओम वॉरिअर्स या संघाचे मालक राहुल ठोंबरे व मंगेश ठोंबरे हे आहेत. या संघाला तब्बल चार फूट उंचीचा आकर्षक चषक व रोख पारितोषिक देण्यात आले. हा चषक भाजपा दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख राजेश मपारा यांनी दिला आहे. या विजया बद्दल यश अँड ओम वॉरिअर्स संघाचे सर्वांनी कौतुक व अभिनंदन केले.
यश अँड ओम वॉरिअर्स संघ आगरी प्रीमियर लीगचा विजेता
