। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते रमेश केणी यांच्या मातोश्री यशोदा यशवंत केणी यांचे सोमवार दि.31 मार्च रोजी निधन झाले. निधनासमयी त्या 75 वर्षांच्या होत्या. यशोदा केणी यांच्या अंतयात्रेसमयी आक्षी सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मित्र मंडळी उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून आणि नातू असा परिवार आहे. त्यांच्या दशक्रिया विधी आणि तेरावं गुरूवारी (दि.10) राहत्या घरी होणार असल्याचे केणी कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.