। माणगाव । प्रतिनिधी ।
संपूर्ण माणगावकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री दत्त मंदिराची यात्रा रविवारी (दि.24) उत्साहात संपन्न झाली. या यात्रेच्या रात्रीच मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहण्यासाठी गेली अनेक महिन्यांपासून ठेवण्यात आलेले बॅरिकेट्स उचलण्यात आल्याने त्याखाली गेली अनेक महिन्यांपासून धरून राहिलेली माती याच्या धुळेने यात्रेकरू हैराण झाले होते. माणगावच्या यात्रेत महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा तसेच मोर्बा रोड मार्ग, माणगाव बसस्थानक आवार, निजामपूर रोड मार्ग याठिकाणी व्यापारांनी आपली दुकाने सजविली होती. शिवाय ठिकठिकाणी खेळण्याची साधने लागलेली होती. या यात्रेत उतेखोल गावाची पालखी, काठी तसेच खांदाड गावाची काठी आकर्षण होते. हि यात्रा जत्रौत्सव कमिटी व माणगाव नगरपंचायत, माणगाव पोलीस ठाणे यांच्या देखरेखीखाली उत्साहात संपन्न झाली.







