येडियुरप्पांवर पॉस्कोंतर्गत गुन्हा दाखल

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी येडियुरप्पा यांच्यावर शुक्रवारी पहाटे बंगळुरुतील सदाशिवनगर पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बड्या नेत्यावर असा गुन्हा दाखल झाल्याने भाजपला निवडणुकीत याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

अल्पवयीन मुलीच्या आईने बीएस येडियुरप्पा यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, 17 वर्षाची पीडिता आपल्या आईसोबत एका फसवणुकीच्या प्रकरणात मदत मागण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी येडियुरप्पा यांच्याकडे गेली होती. त्यावेळी आपल्या मुलीचे येडियुरप्पा यांनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी येडियुरप्पा यांच्यावर पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version