| आगरदांडा | प्रतिनिधी |
उन्हाळा सुरू झाल्यावर रसाळ कलिंगडांना मागणी वाढते. कलिंगड म्हटलं की डोळ्यासमोर लाल गर असलेले फळ दिसते. मात्र, मुरूडच्या बाजारात आता पिवळा गर असलेला कलिंगड दाखल झाले आहेत. ही कलिंगडे मुरूड-शिघ्रे येथील पारागान गावातील असून ती नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. ही कलिंगडे चवीला गोड व आरोग्याला पोषक तसेच डायबिटीस असलेल्या लोकांसाठी उत्तम आहेत. सध्या बाजारात पिवळ्या कलिंगडची किंमत 50 रूपये प्रति किलोने विक्री केली जात आहे. मात्र, या पिवळ्या कलिंगडाला ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यावेळी कृषीवलच्या प्रतिनिधीशी बोलताना आवडी हिरवे म्हणाले की, पिवळ्या कलिंगडाच्या बीयांची किंमत 25 ते 30 हजार रुपये किलो आहे. त्यामुळे जास्त फायदा न बघता कलिंगड 50 रुपये किलो दरानी विक्री केली जात आहे, असे सांगितले.







