योगगुरु रामदेव यांचे घुमजाव


कोरोनावरील लस घेणार
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
अ‍ॅलोपॅथी औषधं आणि डॉक्टरांवर टीका केल्यानंतर पुन्हा एकदा योगगुरु रामदेव यांनी घुमजाव केलं आहे. आता कोरोनावरील लस घेणार असल्याचं योगगुरू रामदेव यांनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर बाबा रामदेव यांनी सर्वांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच योग करोनापासून होणार्‍या समस्या कमी करण्यास मदत करत असल्याचं देखील सांगायला विसरले नाहीत.योग आणि आयुर्वेदचा अभ्यास होणं गरजेचं असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जूनपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण केलं जाईल अशी घोषणा केली आहे. त्यानंतर योगगुरु यांनी लस घेण्याचं आवाहन केल्यानं सर्वांचा भुवया उंचावल्या आहेत.

औषध माफियांवर योगगुरु रामदेव यांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. आमचं संघटनेसोबत कोणतही शत्रूत्व नाही. सर्व चांगले डॉक्टर देवाने पृथ्वीवर पाठवलेले देवदूत आहेत. आमची लढाई डॉक्टरांसोबत नाही. जे डॉक्टर आमचा विरोध करताहेत. ते कोणत्याही संस्थेद्वारे करत नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं. औषधांच्या नावाखाली कुणाला त्रास देऊ नका. लोकांनी अनावश्यक औषधांपासून स्वत:चा बचाव केला पाहीजे. अ‍ॅलोपॅथी आपतकालीन आजारांमध्ये आणि सर्जरीसाठी चांगली आहे. पंतप्रधानांना जनऔषधी दुकानं सुरु करावी लागली. कारण औषध माफियांकडून फॅन्सी दुकानं थाटली गेली आहेत. तिथे अनावश्यक औषधं जास्त किंमतींना विकली जात आहेत, असंही त्यांनी पुढे सांगितलं.

Exit mobile version