चांगल्या रस्त्यांसाठी पैसे द्यावेच लागणार

नितीन गडकरी यांची माहिती
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
चांगली सेवा हवी असेल, चांगले रस्ते हवे असतील तर लोकांना पैसे द्यावेच लागतील, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. नितीन गडकरी यांनी मुंबई -दिल्ली या  राष्ट्रीय महामार्गांवरील कामांचा पाहणी केली.त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एसी हॉलमध्ये कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर भाडं द्याव लागणार. फुकटं करायचं असेल तर मैदानात बसूनही लग्न लावता येतं, असं गडकरींनी टोलसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर उत्तर देताना सांगितलं.
एक्स्प्रेसवेवरुन प्रवास करताना टोलच्या माध्यमातून अधिक पैसे मोजावे लागतात अशा स्वरुपाचा प्रश्‍न गडकरींना विचारण्यात आला होता. एक्सप्रेस-वेमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणांमध्ये वाचतो असंही गडकरींनी यावेळी सांगितलं. आज दिल्लीहून मुंबईला जायला एका ट्रकला 48 तास लागतात एक्सप्रेस-वेमुळे हा वेळ 18 तासांवर येणार असल्याचं गडकरी म्हणाले.
तसेच एक्सप्रेस-वे अधिक वेगवान असल्याने इंधनाचीही मोठ्या प्रमाणात बचत होते असं मत गडकरींनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना गडकरींनी जगातील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे भारतामध्ये उभारला जात असून त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे असं दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेसंदर्भात बोलताना म्हटलं आहे. या एक्सप्रेस-वेमुळे दिल्लीहून अवघ्या साडेबारा तासांमध्ये मुंबईला पोहचता येईल असंही गडकरींनी सांगितलं. या एक्स्प्रेस-वेवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन्स वापरले जाणार आहे. हा मार्ग सहा राज्यांमधून जाणार असून एअर अ‍ॅम्ब्युलन्स म्हणजेच हवाई मार्गाने रुग्णांची ने आण करण्यासाठी वापर करता येईल या दर्जाचा हा मार्ग असेल असं गडकरी म्हणाले. 

Exit mobile version