। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
दारू पाजण्यास विरोध केला असता दोन जणांनी बत्तीस वर्षीय तरुणाला मारहाण केली. जन्मेष शर्मा हे खारघर येथे राहत असून ते कुणाल वाईन तळोजा फेस टू येथे दारू घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याच्या बाजूला एक मुलगा आला आणि त्याने दारू पाजशील का, असे विचारले. त्यानंतर तो जन्मेषच्या हातातील पिशवी खेचू लागला. यावेळी आणखी एक इसम त्या ठिकाणी आला आणि दारूची पिशवी ओढू लागला. जन्मेषने त्यांना विरोध केला असता त्यांनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी बियरची बाटली डोक्यात मारल्याने जन्मेष जखमी झाला. त्यानंतर ते दोघे तेथून पळून गेले. या प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन जणांकडून तरुणाला मारहाण
