गोकुळेश्‍वर तलावात तरुणाची आत्महत्या

अलिवाग । विशेष प्रतिनिधी ।
तालुक्यातील वेश्‍वी येथील गोकुळेश्‍वर तलावात वाडगाव येथील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोन दिवस गायब असलेल्या तरुणाचा मृतदेह सोमवारी सकाळी गोकुळेश्‍वर तलावात आढळल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मनिष मधुकर भाले (वय 37) असे या तरुणाचे नाव आहे. सदर तरुण शनिवारपासून घरातून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याचा शोध घेऊन देखील तो सापडत नव्हता. सोमवारी सकाळी त्याची दुचाकी गोकुळेश्‍वर तलावाजवळ आढळली. त्याचवेळी तलावात त्याचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे आढळले. स्थानिकांच्या मदतीने सदर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सदर तरुणाच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. अलिबाग पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Exit mobile version