। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मौजे आपटा गावाच्या जवळील पाताळगंगा नदीच्या पुलावरील रेल्वे पटरीवर 30 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. महेश मोहन वाघे रा. तपोरा वाडी, सारसई, ता. पनवेल हा रेल्वे पटवरीवरून जात असताना रेल्वेची धडक लागल्याने त्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. त्याला उपचाराकरिता ग्रामीण रूग्णालय चौक येथे नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले असून, गजानन बाळू पवार याने रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रसायनी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून, रसायनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मेहेत्रे अधिक तपास करीत आहेत.






