। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
सुझुकी एक्सेस स्कूटरला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात पारगाव येथील सुमित बळीराम तारेकर (वय 35) याचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी मंगळवारी (दि.28) कामोठे पोलीस ठाण्यात अनोळखी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुमित बळीराम तारेकर हा त्याचा मित्र ओमकार कुबल याची सुझुकी एक्सेस स्कूटरवरून मंगळवारी रात्री तीनच्या सुमारास कळंबोली सर्कलच्या दिशेने जात होता. टी पॉइंटकडून कळंबोली सर्कलकडे जाणाऱ्या हायवेवरील धाकटा खांदा गावाजवळील ब्रिज शेजारील लेनवर अज्ञात वाहन चालकाने त्याच्या स्कूटरला धडक दिली. या झालेल्या अपघातात सुमित याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी कामोठे पोलिसांनी अनोळखी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू
