| नवीन पनवेल | वार्ताहर |
धबधब्याजवळील डोंगरावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.13) दुपारी तीनच्या सुमारास घडली. रवी गाडेकर (24) असे मृत तरुणाचे नाव आहे. सोमवारी चेंबूर येथून पाच जण आदई धबधब्याजवळील डोंगरावर गेले होते. त्यावेळी रवी गाडेकर याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती खांदेश्वर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.





