कर्जत उपजिल्हा रुग्णालयात अर्धवट उपचारामुळे तरुणाचा मृत्यू

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरातील रहिवाशी असलेला तरुण अंगात ताप असल्याने कर्जत उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेण्यासाठी गेला. तेथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर दुसरी सलाईन लावून उपचार सुरू असताना अचानक तब्बेत बिघडली आणि त्यामुळे त्या तरुणाला नवी मुंबईत हलविण्यास सांगण्यात आले. दरम्यान, त्या तरुणाचा कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून चुकीचे उपचार केल्याने मृत्यू झाला असल्याचा आरोप केला आहे.

संतोष गायकवाड हा अंगात ताप असल्याने 11 जुलै रोजी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी गेला.त्यावेळी तेथे असलेल्या बाह्य रुग्ण कक्षात तपासणी झाल्यानंतर त्या तरुणाला उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचार सुरू केले असता सलाईन लावण्यात आली,पहिली सलाईन संपल्यानंतर दुसरी सलाईन लावली असता संतोष गायकवाड या तरुणाची प्रकृती अचानक बिघडली. त्यावेळी त्या तरुणाच्या तोंडातून फेस येऊ लागला असता प्रकृती गंभीर असल्याने कर्जत उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टरांनी त्या तरुणाला नवी मुंबई येथील ऐमजीएम रुग्णालयात हलविले. मात्र तेथे कोणतेही उपचार करण्या अगोदर संतोष गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला होता.

संतोष गायकवाड यांच्या मृत्यु कर्जत उपजिल्हा रुग्णालयात चुकीच्या पद्धतीने उपचार केले गेले असल्याने झाला असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईक यांनी केला

Exit mobile version