| धाटाव | प्रतिनिधी |
रोहा-कोलाड मार्गावरील किल्ला नाक्यानजिक मध्यरात्री दुचाकीचा तोल जाऊन पडल्याने 17 वर्षीय अश्विन मिलगिरे या तरुणाचा मृत्यू झाला. अश्विन हा वरसे येथील रहिवासी असून, मित्रांसोबत कोलाडहून रोह्याकडे जात असताना अपघात झाला. तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला रोहा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. हेल्मेट नसल्याने दुखापत गंभीर झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेमुळे मिलगिरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रोहा -कोलाड रस्त्यावर तरुणाचा अपघाती मृत्यू
