दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |

भरधाव वेगाने मोटरसायकल चालवल्याने ती रस्त्याच्या खाली जाऊन आदळली. या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अक्षय किसन काटकर असे मृत तरुणाचे नाव आहे. अक्षय काटकर रविवरि (दि.24) जुना मुंबई-पुणे महामार्गावरून भरधाव वेगाने दुचाकी चालवत असताना, भोकरपाडा गावाजवळ त्याची दुचाकी रस्त्याच्या खाली गेली आणि जोरात आदळली. त्यात अक्षय काटकर याला गंभीर दुखापती होऊन त्याचा मृत्यू झाला. तसेच, त्याच्या पाठीमागे बसलेला सुशांत दौलत पवार हा जखमी झाला.

Exit mobile version