शॉक लागून तरुणाचा मृत्यू

। मुरुड । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील सोमवंशीय क्षत्रिय माळी समाज नांदगावचे अध्यक्ष रमेश मळेकर यांचा पुत्र रुपेश याला उच्च दाबाच्या वीज तारेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी नांदगावमध्ये घडली. घरी पाळलेल्या बकर्‍यांना झाडाचा पाला आणण्यासाठी घराजवळील झाडावर चढून झाडाची फांदी तोंडात असताना फांदी जवळून गेलेल्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर फांदी पडल्याने शॉर्टसर्किट होऊन त्यास विजेचा जोराचा धक्का लागून तो जमिनीवर पडला. मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात रुपेश यास नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. त्याच्या पश्‍चात आई, वडील, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे.

Exit mobile version