। रसायनी । प्रतिनिधी ।
गणेशनगर चांभार्ली येथे राहणारा तरूण मोहोपाडा येथे गेला होता. तो अज्ञापही घरी परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला परंतु, तो सापडून आला नाही. त्याबद्दल सीता धोत्रे यांनी रसायनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली असून, आकाश रामू धोत्रे (23) असे त्याचे नाव असून तो रंगाने सावळा, उंची 5 फूट 5 इंच, चेहरा उभट, केस काळे, उजव्या हातात लोखंडी कडा, गळ्यात काळा धागा, अंगात सफेद शर्ट व काळी पँट असे वर्णन असून सदर तरूण कोणाला आढळल्यास रसायनी पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन रसायनी पोलिसांनी केले आहे.
चांभार्ली येथून तरूण बेपत्ता
