नितीन राऊत यांनी केले मार्गदर्शन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र अंनिस अलिबाग शाखेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने विज्ञान सप्ताह कार्यक्रम आयटीआय खंडाळे, ता. अलिबाग येथील प्रशिक्षण संस्थेत दि. 3 मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता.
महा-अंनिस राज्यसरचिटणीस नितीन राऊत यांनी संघटनेची वैचारिक भूमिका सांगितली व बुबाबाजीवर चौफेर हल्ला चढवला. तरूणांनी बुवाबाबांच्या भजनी न लागता, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगावा, असे आवाहन केले. तसेच स्वतःच्या समस्यांचे मूळ शोधून उपाययोजना करावी असेही मत राऊत यांनी मांडले.
सुप्रिया जेधे यांनी बुवाबाजीचे चमत्कार करून त्यांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण करून विद्यार्थीना मनोरंजनातून मार्गदर्शन केले. नंदकुमार तळकर, शुभांगी जोगळेकर, सुभाष पानस्कर, निर्मला फुलगावकर, विजय रानडे, पानस्कर मॅडम, श्रावणी मगर, प्रज्ज्वल यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. सुमारे 150 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. केंद्राचे आध्यापक श्री. जोशी यांनी प्रास्ताविक व शेवटी उपस्थितांचे आभार मानले, तसेच यापुढेसुद्धा असेच उपक्रम राबवा, असे आवाहन केले.







