| महाड | प्रतिनिधी |
महाड तालुक्यातील रावढळ येथील आर. सी. सी. अ या संघानी भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सत्संग मैदान खारघर येथे रावढळ चॅम्पियन चषकाचे आयोजन करण्यात आले होते. या एकदिवसीय ओव्हरआर्म सामन्यात तालुका महाड ग्रामीण असोसिएशन मर्यादित 32 संघानी क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता.
स्पर्धेला प्रमुख मान्यवर माजी जिल्हा परिषद सदस्य निलेश ताठरे, रोहिदास आंबवले, समाजसेवक संदीप खिडबिडे, ग्रामपंचायत सरपंच नामदेव रेशिम, माजी मुंबई अध्यक्ष अनंत मांडवकर, विनोद जाधव यांच्यासह अनेकांनी स्पर्धेला भेट दिली तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कर्णधार हरिष राजमाने, बबलू मांडवकर, शैलेश मांडवकर, राजन मांडवकर आदींनी स्पर्धेसाठी संपूर्ण खेळाडू युवा कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी प्रचंड मेहनत घेतली.
अंत्यत चुरशीच्या व अटीतटीच्या सामन्यात चषकांचे प्रथम क्रमांकाचे मानकरी आशीर्वाद यंग स्टार तुडील, तर द्वीतीय क्रमांकाचे विजेता जय हनुमान प्रतिष्ठान खुटिल, तृतीय पारितोषिक भवानी नडगांव अ संघ, चतुर्थ क्रमांक जननी सोमजाई क्रिकेट क्लब यांनी नाव कोरले, तसेच उत्कृष्ट फलंदाज स्वप्नील पार्टे, उत्कृष्ट गोलंदाज विवेक किजबिले, मालिकावीर नारायण उमासरे किताब पटकावला, सदर विजेता संघाला पारितोषिकाच्या स्वरूपात रोख रक्कम व आकर्षक चषक संघाला मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.







